• Mon. Nov 25th, 2024
    क्रिकेट सामना खेळण्यावरून दोघांमध्ये वाद; तरुण संतापला, अन् रागाच्या भरात नको ते करुन बसला

    भंडारा: क्रिकेट खेळताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका खेळाडूला प्राण गमवावे लागले. एक मॅच खेळून झाल्यानंतर पुन्हा मॅच खेळण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला. एका मित्राने दुसऱ्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली येथील मैदानावर आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (२४) असे मृताचे नाव असून करण रामकृष्ण बिलवणे (२१) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही चिखली येथील रहिवासी आहेत.
    गॅस लिक झाल्याने घरात भीषण स्फोट, दिवाळीचे फराळ बनवताना अनर्थ; ऐन सणासुदीत आनंदावर विरजण
    मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार असल्याने चिखली गावातील काही तरुण मुले क्रिकेट खेळण्यासाठी गावातील मैदानावर गेले होते. क्रिकेटचा एक सामना खेळून झाल्यानंतर पुन्हा एक सामना खेळू, या कारणावरुन निवृत्तीनाथ आणि करण यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेल्याने करण संतापला. त्याने त्याच्या हातातील बॅट निवृत्तीनाथच्या पायावर मारली. त्यामुळे निवृत्तीनाथ खाली वाकला, त्याचवेळी करणने पुन्हा निवृत्तीनाथच्या मानेवर बॅट मारली. बॅटच्या जोरदार प्रहारामुळे निवृत्तीनाथ खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला.

    कोयना धरणातील जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाहणी

    त्याला तात्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रसाद रामकृष्ण धरमसारे (२३) रा. चिखली याच्या फिर्यादीवरुन अड्याळ पोलिसांनी आरोपी करण बिलवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed