• Mon. Nov 25th, 2024
    मी शुद्र असल्यामुळे सुप्रिया सुळे माझे नाव घेत नसतील : सुनील तटकरे

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘सुप्रिया सुळे बोलताना माझा उल्लेख केवळ ‘ती व्यक्ती’ असा का करतात माहिती नाही. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असतील’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला.

    प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये तटकरे बोलत होते. त्यांनी आरक्षण, सरकारमध्ये समावेश होण्याचा निर्णय, पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली तर काही प्रश्नांना बगल दिली. ‘सुप्रिया सुळे माझ्या नावाचा उल्लेख टाळतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ ध्येय धोरणांसह राजकारणात काम करते. तिचा उल्लेख व्यक्ती व्यक्ती करणे योग्य नाही. परंतु, मला त्याबद्दल दुःख करण्याचे कारण नाही’, असे ते म्हणाले.

    सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्याने चुकीचा संदेश, अजितदादा गटावर मुख्यमंत्र्यांची नाराजी
    अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही जतनेची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांना २००४ मध्ये संधी होती. परंतु का गेली, कुणामुळे गेली, यावर जास्त बोलणार नाही, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटावरही ताशेरे ओढले. ‘आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले. शरद पवारांकडे परत जाण्‍याचा आता प्रश्नच नाही’, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

    लोकसभेला महायुती किती जागा जिंकणार, एकनाथ शिंदे यांची विरोधकांची टेन्शन वाढवणारी घोषणा
    पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीएचे ४५पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. जागांबाबत भाजपचे नेते व आम्ही मिळून चर्चा करू, असेही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे. महायुतीचे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा आरक्षण देण्याची कुणाची भूमिका योग्य होती, ते पुढील निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच कळेल. टिकणारे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पुढील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    लेकाला मुख्यमंत्रीपदी पाहण्याची अजितदादांच्या आईची इच्छा, काय म्हणाले वळसे पाटील?

    ‘आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर नागपुरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या काही भावना होत्या. त्या फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या’, असे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed