• Sat. Sep 21st, 2024
लोकसभेला महायुती किती जागा जिंकणार, एकनाथ शिंदे यांची विरोधकांची टेन्शन वाढवणारी घोषणा

सातारा: विरोधक ऊठसूट टीका करत असले तरी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही केलेलं काम तसेच गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेले काम समाजोपयोगी राबवलेले योजना याचे मोजमाप जनता निश्चित करेल. आरोप करणाऱ्या विरोधकांना त्याचं सडेतोड उत्तर मिळेल. राज्यात शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप यांना राज्यात ४५ जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
भाजप, अभाविपकडून दहशतवाद पसरवण्याचे काम सुरू; नवसमाजवादी पर्याय संघटनेचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण
विरोधकांना काही कामधंदा राहिला आहे का? असा सवाल करून आम्ही काम करतो. केवळ आरोप करणे हेच काम विरोधकांना असून त्यांच्या आरोपांना कामातून आम्ही उत्तर देत आहोत. त्यांनी बंद ठेवलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. आम्ही कामच करतोय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी प्रकल्प बंद ठेवले असे अहंकारी वृत्तीचे राज्यकर्ते नसतात आणि असं करून चालतही नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम करत राहतो. रोज सकाळी उठलं की विरोधकांना टीका करणे एवढेच काम शिल्लक राहिलं असल्याची संजय राऊत यांचे नाव न घेता टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी पत्रकारांशी बोलताना केली.

मराठा आंदोलनादरम्यान चिमुकलीचा जन्म झाला; बाबांनी नाव ठेवलं ‘आरक्षणा’

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती. आम्ही सर्वजण मिळून आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करणार आहोत. मराठा समाजाने शासनाच्या आश्वासानंतर उपोषण मागे घेऊन आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज यांना मी धन्यवाद दिले आहेत. कायद्याच्या चौकटीत बसणार आणि कायम टिकणार आरक्षण देण्यासाठी आम्ही दिवस-रात्र काम करणार आहोत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तसेच अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed