• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे शनिवारी ९३ आणि रविवारी ११० लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक – माटुंगा ते भायखळा

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते रविवारी पहाटे ४.३५

परिणाम – ब्लॉक वेळेत माटुंगा ते भायखळादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना दादर फलाट क्रमांक एकमध्ये दुहेरी थांबा देण्यात येणार आहे.

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा,धुळीच्या नियंत्रणासाठी खास नियोजन, BMC ने घेतला मोठा निर्णय

हार्बर रेल्वे

स्थानक – कुर्ला ते वाशी

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम – सीएसएमटी ते पनवेल / बेलापूरदरम्यान अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.

Onion Price: सातशे रुपयांनी घरंगळला कांदा; आवक कमी होऊनही भाव उतरल्याने शेतकरी चिंतेत

सहा मार्गांवर ब्लॉक

विद्याविहार रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलाची तुळई (गर्डर) उभारण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत सर्व सहा मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल फेऱ्यांसह मेल-एक्स्प्रेसही विलंबाने धावणार असूनकाही लांबपल्ल्यांच्या गाडया ठाणे रेल्वे स्थानकात थांबवण्यात येणार आहेत.

रद्द लोकल फेऱ्या

– सीएसएमटी-ठाणे – शनिवारी रात्री ११.४७

– ठाणे-सीएसएमटी – रविवारी पहाटे ४.०० आणि पहाटे ४.१६

अंशत: रद्द फेऱ्या

– कर्जत-सीएसएमटी – शनिवारी मध्यरात्रीनंतर २.३३ (ठाणे-सीएसएमटीदरम्यान रद्द)

– सीएसएमटी-अंबरनाथ – रविवारी पहाटे ५.१६ ठाण्याहून अंबरनाथपर्यंत धावणार

देशात बेरोजगारीचा उच्चांक, ग्रामीण भागाने लावला हातभार; वाचा सविस्तर

मेल-एक्स्प्रेस विलंबाने

– भुवनेश्वर-सीएसएमटी, शालिमार-एलटीटी, हावडा-सीएसएमटी ठाणे-दादर स्थानकात थांबवण्यात येणार आहेत.

– विशाखापट्टणम-एलटीटी, मंगळुरू-सीएसएमटी, गोरखपूर-एलटीटी, हैद्रराबाद-सीएसएमटी, गदग-सीएसएमटी सुमारे ३० मिनिटे विलंबाने गंतव्य स्थानी पोहोचणार आहेत.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर रुग्णवाहिका जळून खाक, लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने रुग्ण मृत्यूमुखी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed