• Sat. Sep 21st, 2024
बीआरएस उमेदवाराची अनोखी शक्कल! गावविकासाची थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ; शपथपत्राची सर्वत्र चर्चा

चंद्रपूर: गाव गाड्यातील राजकारण भारी असतं. गाव तिथं बारा भानगडी उगीच म्हणत नाहीत. आता हेच बघा, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवाराने थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ लिहिली. राजकारणात आश्वासनाला आता फार कुणी महत्त्व देत नाहीत. किमान स्टॅम्प पेपरवर घेतलेल्या शपथेवर मतदार विश्वास ठेवतील काय? हे निकालानंतर कळणार आहे. मात्र प्रचाराच्या या नव्या फंडाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
पंचनामे की सरसकटमध्ये अडकली मदत? सरकारी यंत्रणा संभ्रमात; मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला प्रतीक्षाच
जिल्हातील राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही. या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारकी अनेकांनी भुषवली. मात्र हे तालुके विकासाच्या बाबत कमालीचे मागासले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अशात जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधितच बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.

सदावर्तेंची याचिका म्हणजे मराठा समाजाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न | विनोद पाटील

तेलंगाणाला लागून असलेला या भागात “अब की बार, किसान सरकार” नारा गुंजू लागला आहे. या विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे. रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारांनी गावविकासाची शपथ थेट स्टॅम्प पेपरवर लिहून घेतली. सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे, माधुरी आंबेकर, विजय हजारे, कपिल धेटे, रामपोचम काटम या उमेदवारांनी शपथ पत्र लिहिलं आहे. या शपथपत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली. गावात पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार. नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार, असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed