• Mon. Nov 25th, 2024
    सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार

    प्रियांका पाटील, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार सुरु आहे. अनेक समाज बांधव रास्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी करत आहेत. जालनातील अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाचे प्रेरणास्थान बनले आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सरसकट ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे, म्हणून सरकार पुरावे शोधण्यात लागले आहे.

    यादरम्यान, जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात भाऊ व बहीण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात बहिणीची कुणबी तर भावाची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा म्हणजे कुणबी असल्याचाच हा पुरावा आहे. शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावे अशी मागणी होत आहे. जामखेड तालुक्यात मोरे कुटुंबात बहीण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखवल्यांवर आहे. चंद्रभागा भाऊ मोरे – हिंदू कुणबी आणि दिगंबर भाऊ मोरे – हिंदू मराठा, अशी शाळेच्या दाखवल्यांवर नोंद आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

    मराठा आरक्षणासाठी जाळपोळ आणि हिंसक आंदोलन, गुणरत्न सदावर्ते सरसावले, जरांगेविरुद्ध कारवाईसाठी हायकोर्टात याचिका
    सख्खे भाऊ बहीण असूनही दाखल्यांवर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद मिळत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र, जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या नोंदी आहेत. तसेच राज्यात पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जामखेड तालुक्यातील साकत गावात १९२० पर्यंत अनेक दाखल्यांवर कुणबी नोंद आहेत. १९२० नंतर मात्र मराठा नोंद लागल्या आहेत.

    मोहम्मद शमी इतका धोकादायक गोलंदाज कसा झाला? लंकादहन झाल्यानंतर स्वतः सांगितले- कोणतेही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *