मुंबई : मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीबाबत लवकरच अर्थ मंत्रालयासह बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ या संघटनेला गुरुवारी दिले.
‘आहार’च्या शिष्टमंडळाने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शंभूराज देसाई, या तिघांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात जवळपास १८ हजार बार असून त्यावर ५ लाख कामगार अवलंबून आहेत. या बारचे राज्याच्या वार्षिक ३३ कोटी लिटरच्या बीअरच्या विक्रीत निम्मे व भारतीय मद्याच्या वार्षिक २८ कोटी लिटरच्या विक्रीत जवळपास ३० टक्के योगदान आहे. त्यामुळेच मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीच्या निर्णयामुळे उद्योगाच्या मूल्य साखळीवर मोठा परिणाम होत आहे.

यामध्ये हॉटेल व बार मालकांचे नुकसान तर होत आहेच, परंतु सरकारचा महसूलदेखील कमी होण्याची भीती आहे, असा दावा सुकेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील ‘आहार’च्या शिष्टमंडळाने केला.
त्यावर याविषयी येत्या काही दिवसांत अर्थ मंत्रालयासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या विषयाकडे लक्ष देण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना दिले.
Read Latest Maharashtra News And Marathi News