• Sun. Sep 22nd, 2024
लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा, दोन दिवसानंतर नाशकातील प्रसिद्ध बिल्डरचं टोकाचं पाऊल; काय घडलं?

नाशिक : नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज रेल्वे गाडीखाली येत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून मनोहर कारडा यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला? त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मनोहर यांचा भाऊ नरेश कारडा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला होता. एक कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. नाशिक शहरातील नामांकित बिल्डर म्हणून कारडा कन्स्ट्रक्शनची ओळख आहे. तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात आणखी १५ तक्रार अर्ज आले. त्या अर्जामध्ये कारडा व त्यांच्या भावांचे नावे होती.

भारताला उपांत्य फेरीत पोहोचल्यावर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर काय घडलं पाहा…
नाशिक मधील कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात न केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. नरेश कारडा यांना अटक केल्यानंतर दोन दिवसातच त्यांच्या भावाने आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेच्या चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणाचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत.

India In Semi-Finals: मुंबईत १२ वर्षानंतर पुन्हा एकदा लंकादहन; सलग सातव्या विजयासह भारताची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed