• Sun. Sep 22nd, 2024

काड्या करू नका, चर्चेला अंतरवाली सराटीत या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

काड्या करू नका, चर्चेला अंतरवाली सराटीत या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

आंतरवाली सराटी, जालना : सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने आपल्याकडे वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. सरकार आत्ता सांगत आहेत की त्यांना वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ हवाय? हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन. पण वेळ दिला तर सरकार आरक्षण देणार आहे का? असा उलटसवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. त्याचवेळी आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यांना जे काही म्हणणं मांडायचंय, त्यांनी इथे येऊन मांडावं, असं जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी, आमदारांनी उपस्थिती लावली. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर टिकेल, अशाच गोष्टी करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहात. पण यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. त्याचवेळी आंदोलकांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली.

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्या: देवेंद्र फडणवीस
मराठे तापट आहेत, त्यांचा संयम आता संपलाय

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सरकारला चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय, तोवर चर्चेसाठी या. मी मराठा समाजाशी बोलून तुम्हाला वेळ द्यायचा की नाही, हे ठरवतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Reservation: मनोज जरांगेंची प्रकृती खालावतेय, पण सरकार बैठकांचा खेळ खेळतंय; संभाजीराजे छत्रपती संतापले
आम्हाला आरक्षण कसं देणार हे आधी सांगा?

नुसती कागदं देऊन आमच्या मराठा समाजाला फसविण्याचं काम करू नका. आम्हाला आरक्षण कसं देणार हे आधी सांगा. मागच्या वेळी पण मराठा आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालं होतं, पण घोडं कुठं अडतंय, हे आम्हाला कळत नाही. किंबहुना बैठका होतायेत पण त्याच्यावर कार्यवाही होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवरायांसमोर शपथ घेतली पण ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही?; राऊतांचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed