• Sat. Sep 21st, 2024

राजधानीत सरदार पटेल यांची जयंती साजरी; इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी अभिवादन

ByMH LIVE NEWS

Oct 31, 2023
राजधानीत सरदार पटेल यांची जयंती साजरी; इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी अभिवादन

नवी दिल्ली, 31 : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली, तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी निवासी आयुक्त  तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना  राष्ट्राची एकात्मता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली, तर इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर – अरोरा यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी प्रभारी उपसंचालक (माहिती ) श्रीमती अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 196, दि.31.10.2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed