• Sat. Sep 21st, 2024

राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत

राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले असताना आणि चिंतेची परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर अजित पवार यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला आहे. राज्यातील वातावरण पेटले असताना सरकार हातावर हात ठेवून आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मराठा आरक्षण आंदोलनाने कालपासून हिंसक स्वरुप धारण केले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला, तोडगा निघणार?

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षण आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देत आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राजीनाम द्यायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले. भीमा कोरेगाव दंगलीवेळी राज्य पेटले असताना देवेंद्र फडणवीस हातावर हात ठेऊन बसले होते. ते राज्य पेटताना बघत राहिले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे सध्या राज्य पेटताना पाहत आहेत. राज्यात इतकी चिंताजनक परिस्थिती असताना आणि महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना देवेंद्र फडणवीस रायपूरला प्रचाराला कसे जाऊ शकतात? त्यांच्यात एवढा निगरगट्टपणा कुठून आला? मोक्याच्याच वेळी अजित पवारांना डेंग्यू होतो, असे बोलत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती

मुंबईत कडेकोट सुरक्षाव्यवस्था, मंत्रालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक

बीड आणि धाराशीवमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकाही केली होती. त्यामुळे आमदार प्रकाश सोळंखे आणि संदीप क्षीरसागर यांच्या घराप्रमाणे भुजबळ यांच्या घरावरही हल्ला होऊ शकतो, अशी भीती पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे भुजबळांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कुणबी प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या मराठा तरुणावर मराठा क्रांती मोर्चाने ओतलं ऑइल, तानाजी सावंतांवर टीका!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed