• Sat. Sep 21st, 2024
पुणे जिल्ह्यातून ‘मल्हारनगर’ जिल्हा नव्याने करावा, मल्हार गड दसरा मेळाव्यात मागणी

पुणे (जेजुरी) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्हार भक्तांच्या साक्षीने मल्हार गड दसरा मेळाव्याचे आयोजन आज जेजुरीतील छत्री मंदिर परिसरात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मुंबई, खानदेश या विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयोजक नवनाथ पडळकर यांच्या वतीने सोलापूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रो. प्रकाश महानवर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातील उपोषण केलेले युवक यांचाही सन्मान करण्यात आला. आयोजक नवनाथ पडळकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी, त्यासाठी होणारे राजकीय अडथळे, यावर टीकात्मक भाष्य केले.

यावेळी “अलख क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट” प्रस्तुत निर्माता नवनाथ पडळकर यांच्या ‘छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर’ या आगामी चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरचे प्रदर्शन, उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचे दिग्दर्शक सूरज रणदिवे हे असणार आहेत. यावेळी आयोजक नवनाथ पडळकर यांनी आपल्या भाषणातून मांडलेले मुद्दे व घेण्यात आलेले ठराव

१) धनगर ,ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाला सत्तेमध्ये सन्मानाचा वाटा मिळवण्यासाठी लढा उभा करणार
२) राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
३) मेंढपाळांसाठी : मेंढ्यांना चराऊ कुरणे राखीव करावीत, पासचे वितरण करावे
जून ते सप्टेंबर या काळात मेंढपाळांसाठी प्रति महिना सहा हजार रुपये चराऊ अनुदान द्यावे
तसेच ते अनुदान प्रत्यक्षात आर्थिक तरतूद करून लागू करावे.
४) पीकविम्याच्या धरतीवर पशूधनविमा योजना गाई, बैल ,मेंढ्या , शेळयासाठी सुरू करून एक रुपयांमध्ये पशुधन विमा करण्यात यावा.
मेंढपाळ संरक्षणासाठी ॲट्रॉसिटीच्या धरतीवर सक्षम कायदा करण्यात यावा.
५) सरकारने मेंढपाळांसाठी कर्जरुपी अनुदान म्हणून दहा हजार कोटी रुपयेची केलेली तरतूद प्रत्यक्ष त्यांच्या पदरात पडावी यासाठीचे तात्काळ निर्णय घ्यावेत.
भटक्या जमाती च्या वस्त्या जोडणारी यशवंतराव होळकर रस्ते जोड योजनेसाठी केलेल्या ४ हजार कोटीच्या तरतुदीची अंमलबजावणी व्हावी. त्यातील ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप कमी करावा व थेट वस्तीतील ग्रामस्थांच्या अर्जावर निर्णय व्हावा.
६) सरकार विविध योजना जाहीर करते, त्यातील मोजक्या योजनांना तरतूद केली जाते. परंतु त्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलीही विशेष यंत्रणा नसते यासाठी समाजाने स्वतः सामाजिक संस्थांच्या मदतीने एक स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी लागेल.त्याविषयी संघटना लवकरच निर्णय घेणार.
धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी व ओबीसीच्या आरक्षणाचे रक्षण यासाठी संघटना सदैव तत्पर राहणार.
७) राजराजेश्वर यशवंतराव होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक वापगाव येथे तात्काळ मार्गी लावावे
८) होळकरशाहीमधील बांधलेले “मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर जेजुरी” यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन मंदिरासह परिसरातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचा नियोजनबद्ध जतन , विकास करण्यात यावा.
९) महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्तासाठी केजी टू पीजी शिक्षण देणारे “भटक्यांचे विद्यापीठ” हे भटक्यांची पंढरी असणाऱ्या मढी- जिल्हा अहमदनगर(अहिल्यानगर)
येथे सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
१०) पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती इंदापूरसह आसपासच्या तालुक्यांचा समावेश करून स्वतंत्र जिल्हा निर्मिती करण्यात यावी व त्या नवीन जिल्ह्याचा “मल्हारनगर” असे नामकरण करण्यात यावे .

वरील सर्व ठरावांची मांडणी मल्हारगड दसरा महामेळावा संयोजन समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जाहीर सभेत मांडले व सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर व नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, निवृत्त IFS ऑफिसर रामचंद्र पोले, मोहन खामगळ, डॉक्टर संजय भोसले, दयानंद खरात, रामभाऊ मरगळे, मोतीराम देवकाते विद्या पोले रघुनाथ मोहिते माऊली चौरे, श्रावण पवार, श्रीकांत पाटील किसन हजारे, अनिल पवार, राम जानकर, तुकाराम कोकरे, रामदास महानोर, शुक्राचार्य पोले, वैभव लंबाते, गणेश कुंभार, सुरज रणदिवे, विशाल शेंडे, माऊली वाघमोडे, आबा थोरात, जयपाल दगडे , ऍड दता शेंडगे, सचिन खोमणे, घनश्याम मोरे,संतोष खोमणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed