• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणासाठी अजून एक बळी! तरुणानं विहिरीत उडी घेत संपवलं जीवन, कुटुंबाचा आक्रोश

    जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एक बळी गेल्याची घटना जालन्यात घडली आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील कचरेवाडी येथील मराठा बांधवांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोपान बाबुराव कचरे (३०) रा. कचरेवाडी ता. जालना असं या आत्महत्या केलेल्या मराठा तरुणाचे नाव आहे.
    धक्कादायक…! रागात पत्नीवर हल्ला; आईने पाहताच पोटात चाकू सोडून पती फरार, नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार, सोपान यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सोपान हे मराठा चळवळीमध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय होते. प्रत्येक आंदोलनात, उपोषणात, मोर्चात ते सहभागी होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मागील सहा दिवसांपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील सहा दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या पोटात अन्नाचा एक कण नसून मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावत चालली आहे.

    मराठा आंदोलन पेटलं, छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद रेल्वे पाऊण तास खोळंबली

    याच गोष्टीच्या ताणातून जालन्यातील कचरेवाडी येथील रहिवासी असलेले मराठा बांधव सोपान कचरे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आज विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. सोपान यांचा मृतदेह तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोपान यांच्या मृत्यूने कचरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी संतप्त नातेवाईकांनी तालुका जालना पोलीस ठाणे गाठत सोपान यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली, अशी तक्रार दाखल करून पुढील तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed