• Thu. Nov 28th, 2024

    आधी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रेरणेसाठी ट्विट, नंतर तेच ट्विट डिलीट, भाजपचं चाललंय काय?

    आधी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रेरणेसाठी ट्विट, नंतर तेच ट्विट डिलीट, भाजपचं चाललंय काय?

    मुंबई : महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले. या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या ट्विटची चर्चा सुरूच असतानाच ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यामुळं भाजपात नेमकं चाललंय? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

    देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या ट्विटने खळबळ
    महाराष्ट्र भाजपच्या ट्विटनंतर लोकसभा निवडणुकीआधी नेतृत्वबदल केला जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटलेला असतानाच मोठी राजकीय घडामोड घडवून आरक्षणाचा प्रश्न काही काळापुरता तरी चर्चेतून गायब करायचा हा होरा असू शकतो, असाही अंदाज राजकीय विश्लेषक लावत होते. अशातच हे ट्विट भाजपने डिलीट करून संभाव्य चर्चांवर पडदा टाकला.

    BJP Tweet.

    महाराष्ट्र भाजपचं ट्विट

    महाराष्ट्र भाजपने ट्विट केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातच पुढील निवडणुका लढवल्या जातील, अशी सारवासरव भाजप नेते करीत होते. तर आमच्यासकट देवेंद्रजी पुन्हा आलेलेच आहेत, असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न शिंदे गटातील नेते मंडळी करीत होते. पण दिग्गज राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच महाराष्ट्र भाजपने ते ट्विट डिलीटही केले. दरम्यान, हे ट्विट करून महाराष्ट्र भाजपने लिटमस टेस्ट घेतली का? असाही सवाल उपस्थित होतोय.

    कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी ट्विट, वेगळा अर्थ काढू नका : केशव उपाध्ये

    हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आता पर्यत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये, असं स्पष्टीकरण भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed