• Mon. Nov 25th, 2024

    दिवाळी बोनस आला रे… कंपन्यांत भरघोस ‘बक्षिसी’, कुणाला पगाराच्या २० टक्के, कुणाला ८० हजार

    दिवाळी बोनस आला रे… कंपन्यांत भरघोस ‘बक्षिसी’, कुणाला पगाराच्या २० टक्के, कुणाला ८० हजार

    सातपूर : दिवाळी आली की औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये बोनसचे वेध लागतात. अनेक कंपन्यांनी यावर्षी भरघोस बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपन्यांनी १५ ते ८० हजारांपर्यंत बोनस जाहीर केला आहे. बोनस आला रे… म्हणत कामगारांमध्ये उत्साह दुणावला आहे. यामुळे आता दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजणार आहेत.

    औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील कामगारांसाठी लढा उभारणाऱ्या सीटू संघटनेने दिवाळी बोनस जाहीर केले आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टीडीके लि. या कंपनीतील कामगारांना ५० ते ८० हजार रुपये बोनस मिळाला. त्याप्रमाणे इंडियन व्हाल्व या कंपनीतील कामगारांना वेतनाच्या २० टक्के बोनस, सोमेश फोर्जिंग कंपनीतील कामगारांना पूर्ण बेसिक डीएवर १३.५ टक्के बोनस व १५०० रुपयांची भेट, आनंद आय पॉवरमध्ये ३२ हजार रुपये, गोल्डी प्रिसिजनमध्ये २४ ते २५ हजार रुपये, सिरीन ऑटोमध्ये २६ हजार रुपये, चैतन्य फार्मासिटीक्युलमध्ये १९ हजार रुपये, इनटेक कंट्रोलमध्ये दीड महिन्याचे पूर्ण वेतन, ऑर्बिट सिस्टम बॉम्बेमध्ये १८ ते ४२ हजार रुपये बोनस जाहीर झाला आहे.

    सणासुदीला ‘इंधन’दिलासा? पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत, शिंदे सरकारकडे तीन प्रस्ताव
    सिंग क्वारीमध्ये एक महिन्याचे पूर्ण वेतन, जयनिक्स इंजिनीअरिंगमध्ये ३८ हजार रुपये याप्रमाणे यशस्वी बोनसचे करार करण्यात आलेले आहेत. याकरिता व्यवस्थापनाने सहकार्य केले. यावेळी युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार आणि कंपन्यांचे व्यवस्थापक व कमिटी सदस्य उपस्थित होते.

    ३५ टक्के फंजिबलचा फायदा मूळ रहिवाशांसाठीच, Redevelopment बाबत हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
    कामगारांना बोनस मिळाल्यामुळे सातपूर, नवीन नाशिक, सिडको व नाशिक बाजारपेठेत खरेदीसाठी कामगार कुटुंबीयांची गर्दी होणार आहे. कामगार कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सीटू पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

    मुंबईकरांनी ‘लुटलं’ खरंखुरं सोनं, तब्बल ७८० कोटींची सोनेखरेदी, मोठ्या दागिन्यांना डिमांड का?

    उर्वरीत कंपन्यांमध्येही लवकरच घोषणा

    बोनसमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उर्वरीत कंपन्यांमधील कामगारांना देखील येत्या दोन ते तीन दिवसांत दिवाळी बोनस जाहीर केला जाणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed