• Sun. Sep 22nd, 2024
दादांपाठोपाठ आता ताई झेडपीमध्ये; जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पुणे: पालकमंत्री झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरासह जिल्हा परिषदेतील कामांचा आढावा घेताना शिक्षण, बांधकाम विभागांची झाडाझडती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेत कामांचा आढावा घेत सूचना केल्या.
हात नाही लावायचा साहेब, आमदार करून दिलं तर प्रश्न विचारणारचं; तरुणाचा संताप, आमदारांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात, पुण्याचे कारभारी बदलले आहेत. आता पुण्यात लक्ष घालणार आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. त्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांना विचारता त्यांनी त्याबाबत फारसे बोलणे टाळले. त्याच दिवशी शुक्रवारी अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत देऊन आपल्या स्टाइलने कामांचा आढावा घेतला. अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर पुण्यात सक्रिय झाले आहे. त्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे या अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रिया सुळे यांची सोमवारी भेट दिली. त्यावेळी विविध कामांचा आढावाही त्यांनी घेतला.

एकाच ग्रामसेवकाकडे तीन-चार ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने नागरिकांची कामे ठप्प होत आहेत. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच औषध पुरवठाचा आढावा घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. अंगणवाड्यामध्ये पाणी, वीज, स्वच्छता गृहांची सुविधा योग्यरित्या उपलब्ध करावी. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी. तसेच मुलींच्या जन्म दरचा अहवाल वेळोवेळी तयार करावा. वैयक्तिक लाभांच्या योजना, लाभार्थ्यांचा अहवाल तयार करून माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.

समाजातील गरीब वर्गाला आरक्षणाची गरज, माझ्या मुलांना आरक्षणाची गरज नाही ; अजित पवारांची भूमिका

जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजूर कामांची सद्यस्थिती माहिती उपलब्ध व्हावी. कामे तातडीने पूर्ण होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, अशीही मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम यांनी या ठिकाणच्या रस्त्यांची माहिती दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात चिंताजनक आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य देण्याकडे लक्ष वेधण्यात आले. मतदारसंघातील प्रत्येक महामार्ग हा ‘झिरो अँक्सिडेंट झोन’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण तसेच विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नवले पुल परिसरातील अपघात कमी करण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तज्ज्ञ नवले पुलाची पाहणी करणार आहेत. तसेच कात्रज चौकातील पूर आणि फुरसुंगे ते सासवड या मार्गातील रस्त्यांचा आढावा सुळे यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed