सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत काही मागण्या अशा निर्माण करा की, त्या चर्चेद्वारे पूर्ण होतील. शालेय विद्यार्थिनींना आपण एसटी बसचा पास दिला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना एसटी बसचा पास देता येईल का, याबाबतही चर्चा करता येईल. शालेय विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी आपण सायकली दिल्या आहेत. विद्यार्थिनींना घरापासून महाविद्यालयाचे अंतर दूर पडत असल्याने, ओडिशा सरकारने त्यांना स्कूटी देण्याचा निर्णय घेतला. तसाच प्रयोग आपल्याकडे करता येईल, याबाबतची विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बोलतो काय…मीडियात येत काय ?
मी इथे बोलत असताना, मला जाणीव आहे की, काही पत्रकार दृश्य आणि अदृश्य स्वरूपात येथे उपस्थित असतील. त्यामुळे ते आता छापतील की, विद्यार्थिनींना स्कूटी देण्याचा निर्णय झाला. मी माईकमधून काय बोलतो आणि मीडियात काय बाहेर पडत, यामध्ये फारच फरक पडत आहे. त्यामुळे मी म्हणतो की, तुमच्या माईकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. यालाही मी घाबरतही नाही, असे पाटील यांनी सांगितले
Read Latest Maharashtra News And Marathi News