• Sat. Sep 21st, 2024
मुंबई-सोलापूर वंदे भारतला उदंड प्रतिसाद; कोणत्या वयोगटातील प्रवासी संख्या अधिक? आकडेवारी समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला तरुण प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सोलापूर या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वेतर्फे राज्यात धावणाऱ्या चारही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

रेल्वेने दुसऱ्या टप्यात मध्य रेल्वेच्या अंतर्गत चार नवीन ‘वंदे भारत’ ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. त्यामध्ये मुंबई-पुणे-सोलापूर (१० फेब्रुवारी २०२२), मुंबई-शिर्डी (१० फेब्रुवारी २०२२), बिलासपुर-नागपूर (११ डिसेंबर २०२२) यांसह मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ २०२२मध्ये सुरू झाली. अलिशान आणि गतिमान प्रवासामुळे प्रवाशांची या ट्रेनला पसंती मिळाली.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना युवकांचा घेराव, मराठा आरक्षणावर विचारला जाब, अजितदादा सांगितली भूमिका

गेल्या महिन्यात १५ सप्टेंबर ते १३ ऑक्‍टोबर दरम्यान, विशेषत: मुंबई-पुणे-सोलापूर ‘वंदे भारत’ने आतापर्यंत ५६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये वय वर्षे १५ ते ४५ या वयोगटातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मुंबई-शिर्डी ‘वंदे भारत’चा ४४ हजार ८५७ प्रवाशांनी लाभ घेतला. बिलासपूर-नागपूर ट्रेनने २९ हजार ७७२ आणि मुंबई-मडगावने १२ हजार ९३३ प्रवाशांनी प्रवास केल्याचे आढळून आले.

‘मुंबई-पुणे-सोलापूर’वर पसंतीची मोहोर

एकूण प्रवासी ५५९०५

पुरुष प्रवासी ३४०१६

महिला प्रवासी २१८८१

वयोगट संख्या

१५ ते ३० – १८,७६४

३१ ते ४५- १८,०४२

४६ ते ६० – ११,५२८

६० पेक्षा अधिक – ५,१३३

एक ते १४ वर्षे – २,४३८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed