• Tue. Nov 26th, 2024
    पुणेकरांना आठवला संतोष माने: वर्दळीच्या चौकात काळजाचा ठोका चुकवणारा Video; काय घडलं?

    पुणे: पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीएलच्या एका चालकाने बेदरकारपणाने बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. बस चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव निलेश सावंत असे आहे.

    या घटनेमुळे पुणेकरांना पुन्हा संतोष माने आठवला. सेनापती बापट रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रकार होता. रस्त्यावर एका कार चालकासोबत झालेल्या वादामुळे चिडलेल्या पीएमपीएमएल बस चालकाने बेदरकारपणाने बस रिव्हर्स चालवत प्रवाशांचा जीव टांगणीला लावला. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलजवळ ही घटना घडली. दरम्यान, निलेश सावंतला चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे.
    PMPML Bus: पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक; थरारक घटनेने शहर हादरलं
    निलेश सावंत पीएमपीएमएलची बस क्रमांक एमएच १४ एचयु ५७२५ ही घेऊन पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता. त्यावेळी या बसने एका कारचालकाची कार दाबली, असा समज झाल्याने कारचालकाने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्याची बस थांबवण्यासाठी तो सांगत असताना आरोपी सावंत याने ही बस भरधाव वेगात पाठीमागे घेतली.

    कोथरूड डेपोची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक ३३ मार्ग क्रमांक २७६/१३ चालक क्रमांक के.६४० निलेश ज्ञानेश्वर सावंत बस एनडीए गेट ते चिंचवड जात असताना रत्ना हॉस्पिटल येथे वेडी वाकडी बस चालवल्याने एका कारला बस घासून गेल्याने कार चालकाने पुढील चौकात विचारणा केली. त्यानंतर त्यांचा शाब्दिक वाद झाल्याने बस चालकाने भर चौकात राग येऊन रस्त्यावरील वाहनांचा कोणताही विचार न करता बस अचानक चौकातून पाठीमागे रिव्हर्स घेतली आणि वाहने उडवली. त्यानंतर पुन्हा पुढे चौकापर्यंत नेली. यामध्ये बसमधील प्रवाशांची घबराट होऊन प्रवाशांनी पोलिसांना फोन केला असता पोलिसांनी चालकास बससह चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये नेले असून ड्रायव्हरला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

    IPL ठरणार टीम इंडियासाठी डोकेदुखी? मिचेल सँटनरचा भारताला सर्वाधिक धोका, का ते घ्या जाणून

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed