• Thu. Nov 14th, 2024
    Pune Plane Accident: पुण्यात पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात, बारामतीत नेमकं चाललंय तरी काय?

    पुणे (बारामती) : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामतीत विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ विमान कोसळले आहे. बारामती येथील जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ हे विमान कोसळले आहे. यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

    बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था आहे. गेल्या काही दिवसातील विमान कोसळल्याची ही पाचवी घटना आहे. आता कोसळलेले विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अचानक विमान कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शिकाऊ विमान कोसळल्याच्या घटना घडत आहेत. बारामती आणि इंदापूर येथे विमान कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विमान कोसळल्याने माणसाचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; रेल्वे स्टेशनपासून जवळचं दुर्घटना, नेमकं काय घडलं?
    कधी कधी झाले अपघात…

    १. नीरा नदीच्या पुलाखालून विमान घालण्याच्या नादात अपघात झाला होता.

    २. फेब्रुवारी २०१९ मध्ये रुई बाबीर गावात अपघात झाला होता.

    ३. २०२२ मध्ये इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे तातडीचे लँडिंग करावे लागले होते.

    ४. दोनच दिवसांपूर्वी रेड बर्ड कंपनीच्याच विमानाचा विमानतळानजिक अपघात झाला होता.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील कटफळ येथे एमआयडीसी मधील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे विमान गुरुवारी (दि. १९ ) रोजी दुपारी ३ वाजता कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आहे. ते नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

    मुंबईकरांचं टेन्शन मिटणार; शहरात पार्किंग क्षमता वाढणार, वाचा नक्की काय होणार?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *