• Sat. Sep 21st, 2024
दोन गटात आधीपासूनच वाद; उत्सवात समोरासमोर आले, पुन्हा भांडणाला तोंड फुटलं, अन्…

ठाणे: आयरे गावातील गावदेवी मंदिरात शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान दोन गटात तुफान राडा झाला आहे. आयरे गाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ती मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ५० ते ६० जणांचा गट अचानक एकमेकांशी भिडले. त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक भयभीत होऊन इतरत्र पळत सुटले. काय झाले हे समजण्याच्या आताच काही तरुण आपापसात भिडले दगडांनी आणि चोपरने वार एकमेकांवर करण्यात आले. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून यात एक महिलाही जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अवघ्या २ जणांना ताब्यात घेतले आहे.
नवरात्र उत्सवाला गालबोट! दोन गटात हाणामारी; चार ते पाच जण गंभीर जखमी, डोंबिवलीत नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात व्यावसायिक ओंकार भगत (२७), त्याचे मित्र आणि एक महिला असे गंभीर जखमी झाले आहेत. ओंकारच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचीन केणे, नरेंद्र जाधव, गौरव जुळवे, अखिलेश धुळप, वरूण शेट्टी, योगेश सुर्वे, नितीन यादव, गौरव फडके आणि इतर १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक नेत्या-पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने होणारा गंभीर प्रकार टळला. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि प्रतिस्पर्धी गटात पूर्व वैमनस्यातून काही वाद आहेत. त्यांच्यात या विषयावरून नेहमी धुसफूस सुरू असते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता नवरात्रोत्सव असल्याने ओंकार आपल्या मित्रांसह आयरे गावातील गावदेवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेला होता.

भारतातले विविध धर्मांचे लोक हिंदूच होते, परकीय आक्रमणांमुळे धर्मांतर झालं, फडणवीसांचा दावा

त्यावेळी तेथे सचीन केणे आणि इतर जण धारदार शस्त्रे घेऊन त्यांची वाट पाहत उभे होते. ओंकारला पाहताच त्यांनी ओकांरशी भांडण उकरून काढून मारहाण सुरू केली. ओंकारचे मित्र वाद मिटविण्यासाठी पुढे आले तर त्यांनाही दगडीचा मारा, धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात करण्यात आले. हा प्रकार पाहून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसह महिला, लहान मुलांची पळापळ झाली. ही बाब कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मात्र पोलीस येताच तरुणांनी तेथून पळ काढला होता. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed