• Sat. Sep 21st, 2024
बेकायदेशीर खंडणी प्रकरण; तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन, नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपूर: बेकायदेशीर खंडणी प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस मुख्यालयातील हवालदारासह ३ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यालयातील हवालदार पप्पू ताराचंद यादव आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी वेदप्रकाश यादव आणि सुधीर कनोजिया यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात आलेले अनेक प्रकल्पही चांगल्या सवलती देऊनही गुजरातने पळविले, अनिल देशमुखांचं टीकास्त्र
नागपूर शहरात पोलीस आयुक्तांनी यापूर्वी अवैध धंद्यांना आश्रय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारण्याचा सल्ला दिला होता. असे असतानाही आपली नोकरी धोक्यात घालून अनेक पोलीस अवैध धंद्यात गुंतल्याचे समोर आले आहे. मुख्यालयात कार्यरत हवालदार पप्पू यादव आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी वेदप्रकाश यादव आणि सुधीर कनोजिया हे बेकायदेशीर खंडणी तसेच त्यांना संरक्षण देत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती.

बेकायदेशीर खंडणीच्या एका प्रकरणात नवीन कामठी येथे कार्यरत असलेल्या पप्पू यादवची मुख्यालयात बदली झाली होती. तरीही तो त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने अवैध खंडणीचा धंदा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पप्पू यादव आणि वेदप्रकाश यादव हे दोघेही नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. पप्पू यादवची मुख्यालयात बदली होताच त्याने नवीन कामठीच्या डीबी टीममध्ये तैनात असलेल्या त्याच्या दोन सहकाऱ्यांना खंडणीखोरांची यादी सुपूर्द केली.

शिवतीर्थाशी स्पर्धा करण्याचे सगळे मनसुबे उधळले जातील; विनायक राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

सुत्रांच्या माहितीनुसार, अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून दरमहा सुमारे २०,००० रुपये गोळा केले जात होते. ज्यामध्ये निलंबित पोलीस कर्मचारी निर्भयपणे डीबी पथकाच्या टीम १ च्या नावाने ३ हजार, टीम २ च्या नावाने ३ हजार, सब इन्स्पेक्टरला ४ हजार आणि कलेक्टरच्या नावाने २ हजार यासह २० हजार वसूल करत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास डीसीपी झोन ५ श्रावण दत्त यांच्याकडे सोपवला होता. तपासात बेकायदेशीरपणे खंडणी उकळण्यात या तिन्ही पोलिसांचा सहभाग आढळून आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, पोलीस आयुक्तांच्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा अवैध खंडणीखोर सावध झाले असून, या कारवाईबाबत पोलीस दलात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed