• Sat. Sep 21st, 2024
भाजप आमदाराच्या पीएला पुत्रशोक, डेंग्यूसदृश आजारामुळे १३ वर्षीय लहानग्याचा मृत्यू

धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात डेंग्यू आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले असून ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून यात एका १३ वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. शिरपूर येथील भाजपचे आमदार काशीराम पावरा यांचे स्वीय सहाय्यक असलेले सचिन माळी यांचा मुलगा स्वामी सचिन माळी याचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील क्रांतीनगर मध्ये एका १३ वर्षीय बालकाचा डेंगू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. हिमांशू उर्फ स्वामी सचिन माळी (वय १३) असं मयत बालकाचे नाव आहे. १२ ऑक्टोबर रोजी त्याची तब्येत बिघडल्याने त्यास शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

रोहितची बॅट सगळ्यांवर पडली भारी, ICC रँकिंगमध्ये विराटला मागे टाकत कितव्या स्थानी पोहचला हिटमॅन?
स्वामीचे वडील सचिन माळी हे शिरपूर शहराचे आमदार काशिराम पावरा यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांच्याच मुलाचा डेंग्यूने बळी घेतल्याचे शहरात बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासह शिरपूर शहरात रोष व्यक्त होत आहे. सचिन माळी यांचा स्वामी हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूमुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातलेले असतांना दुसरीकडे प्रशासन मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसल्याचे चित्र आहे.

शिरपूर शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत शहरासह तालुक्यात डेंगू सदृश आजाराने ग्रासलेले बहुतांश नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूचा प्रसार लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन डेंग्यू रोखण्यासाठी निष्क्रिय असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बाळासाहेबांच्या ‘रणरागिणी’ने ४५ वर्षांची साथ सोडली, ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, पक्षांतराचं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed