छत्रपती संभाजीनगर: शहरातील औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकांनी दिलेला होमवर्क केला नाही म्हणून वडील रागावले होते. यातून सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःच्या घरात गळफास लावून आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवी अनिल उलेमाले (१२) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रणवी ही सेंट लॉरेंन्स शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती. प्रणवी शाळेतील शिक्षकांनी सुचना वहीत नोंद केली होती की, प्रणवी होमवर्क वेळेवर करत नसल्याची सुचना होती. त्यानंतर वडील होमवर्क करत जा म्हणून रागावून कामावर निघून गेले. त्यानंतर प्रणवीने जिन्याच्या वरील पत्रा शेडवरील लाकडी बल्ली ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

बराच वेळेपासून खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने आजोबांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रणवी हि लटकलेली दिसली. बेशुद्धावस्थेत तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई-वडील गेले होते. प्रणवीचे वडील हे पेंटर असून तिची आई सराफा दुकानावर कामगार म्हणून करतात. वडील अनिल उलेमाले यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. प्रवणी सर्वात मोठी होती.