आयशर टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या होत्या. राजेंद्र बाबल्या डांगे (४०, हातखंबा) येथे राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर खोळंबलेले ट्रॅफिक रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.
हातखंबा येथे राहणारे राजेंद्र डांगे हे घरे बांधण्याची काम करायचे. कोल्हापूरमधून लाद्या आणण्यासाठी ते गेले होते. पण कोल्हापूरहून रत्नागिरी येथे परत येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. या ट्रकमधील लाद्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रत्नागिरीनजीक हातखंबा येथे अपघात झाला. अंगावर दगडी लाद्या पडल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रक ड्रायव्हर आतमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढून दोन जखमी व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कोल्हापूरहुन लाद्यांनी भरलेला आयशर हातखंबा दिशेने येत होता. तर ट्रक हा पालीच्या दिशेने जात होता.
डांगे कुटुंबातील कर्ता पुरुष या अपघातात गेल्याने या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी नजीक हातखंबा येथे मुंबई गोवा महामार्गावर गावानजीक असलेल्या पुलावर समोरासमोर ट्रक आणि यांच्यामध्ये टक्कर होऊन लादीने भरलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. ट्रकमध्ये असलेल्या व्यक्तीवर लाद्या पडून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे हातखंबा गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र डांगे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली एक मुलगा असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त कळताच रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत करून महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.