छत्रपती संभाजीनगर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले – डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावरील महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या नावावर स्प्रे मारून रंग लावत नावे मिटवल्याने आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. हा संपूर्ण प्रकार विद्यापीठाच्या लंच होम मध्ये घडला.
या प्रकरणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरामध्ये तब्बल १०० ठिकाणी अभाविप हे शब्द लिहीत ठिकठिकाणी विद्यापीठाच्या भिंती,फलक यांचे विद्रुपीकरण केले.हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी महात्मा फुले – डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावरील महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या नावावर स्प्रे च्या माध्यमातून रंग लावत महापुरुषांची नावे मिटविण्याचा प्रयत्न केला.यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करून विद्रुपीकरण करणाऱ्या कडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी कारवाई न केल्यास अभाविप च्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला रंगविण्यात येऊन यांना पाठीशी घातल्यास विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने प्र. कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे देण्यात आले होते.
विद्यापीठाच्या लंच होम मध्ये आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये फलकावरून शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एक दुसऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अभाविप प्रचार कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बेल्ट काढून अभाविपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळीरिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन इत्यादी संघटनांचा समावेश.यात सचिन निकम, गुणरत्न सोनवणे,ॲड.अतुल कांबळे,राहुल वडमारे, अमित घनघाव,संदीप तुपसमिंद्रे यांच्यासह कार्यकर्ते होते.

Read Latest Maharashtra News And Marathi News