• Mon. Nov 25th, 2024

    नाशकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांनी जीव गमावला, कुटुंबाला धक्का

    नाशकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांनी जीव गमावला, कुटुंबाला धक्का

    नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश डावरे (वय १७) आणि दुर्गेश डावरे (वय २२) असे मृत तरुणांची नावं आहेत. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेत दोन कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश आणि दुर्गेश सकाळच्या सुमारास आपली पल्सर दुचाकी क्रमांक एम.एच.१५ जे. जी. ९६४५ ने कोनांबे येथून सिन्नरकडे निघाले होते. यावेळी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर आले असता समोरुन विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    दुर्गा देवीच्या या मंदिरात ८०० वर्षांपासून महिलांना नो एन्ट्री, कारणही आश्चर्यचकित करणारं
    अपघात झाल्यानंतर यावेळी डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेशी संपर्क साधून जखमी तरुणांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दोघाही तरुणांना तपासून मृत घोषित केले. या दोन्ही कर्त्या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने डावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बारा प्रवाशांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा सिन्नर येथे दोन तरुणांचा परत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed