• Sat. Sep 21st, 2024
पुण्यातील विद्यार्थी आणि टोल कर्मचाऱ्यांत तुफान राडा, VIDEO व्हायरल, जुन्नर तालुक्यातील घटना

पुणे : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे चाळकवाडी टोल नाक्यावर टोल आकारण्यावरून पुणे येथील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचे विद्यार्थी व टोलनाका कर्मचारी यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचे विद्यार्थी आळे येथील बाळासाहेब जाधव कॉलेजमध्ये कबड्डी खेळण्यासाठी आले होते. कबड्डी खेळून झाल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा पुण्याकडे जात असताना जादा टोल आकारला म्हणून विद्यार्थी आणि टोलम कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली, याचं रुपांतर तुफान हाणामारीत झालं. टोल कर्मचाऱ्यांनी हा टोल नियमाप्रमाणेच होता. परंतु तो त्यांनी भरण्यास नकार दिला असे सांगितले. दरम्यान, टोल कर्मचारी आणि विद्यार्थी समोरासमोर एकमेकांना भिडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Toll Naka: वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार
चाळकवाडी टोलनाक्यावर असे प्रकार नेहमीच पहायला मिळतात. येथील कर्मचारी दादागिरी करून टोल वसुली करत असल्याच्या तक्रारी प्रवाशी नागरिकांकडून नेहमी केल्या जातात. पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या जुन्नर तालुक्यात हा टोलनाका आहे. जेव्हापासून हा टोलनाका सुरू झाला आहे, तेव्हापासून यावर वादाच्या घटना घडत आहेत. प्रवाशी नागरिकांना याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे अशी विनंती येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

मुंबईच्या दारी टोल’कोंडी’, पिवळ्या रेषेच्या पलिकडील वाहनांकडूनही जोरात वसुली, ५ मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास वाया
कर्मचाऱ्यांकडून अनेकदा मारहाणीचे प्रकार देखील होत असतात. आज घडलेला प्रकार हा शालेय विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed