• Sat. Sep 21st, 2024
रिफेक्टरीच्या जेवणात झुरळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक,आंदोलन सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीच्या जेवणात सोमवारी रात्री झुरळ आढळण्याचा प्रकार घडला. या प्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, रात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पुणे विद्यापीठात वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा व्हावी, यासाठी रीफेक्टरी कार्यरत आहे. या रिफेक्टरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुपारी आणि रात्री माफक दरात जेवण देण्याचे येते. सोमवारी रात्री विद्यार्थी जेवण करीत असताना, भाजीत झुरळ आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडत आंदोलनाला सुरूवात केली.

समलैंगिक जोडप्यांसोबत भेदभाव नको, Same Sex Marriage विषयी सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करायला सुरुवात केली. यावेळी विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे विद्यार्थ्यांशी चर्चा करीत आहेत.

बुमराहच्या घातक गोलंदाजीला कसे सामोरे जावे? वर्ल्डकप विजेता कर्णधार म्हणाला- माझ्या सारखी थेट निवृत्ती घ्यायची
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी विद्यापीठाच्या मुलामुलींच्या वेगवेगळ्या मेसमध्ये सातत्याने आळई , प्लास्टिक, झुरळं निघाल्याच्या घटना घडत आहेत, असं म्हटलं. आज विद्यार्थी व वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन कुलगुरू कार्यालयाच्या समोर ठिया आंदोलन केले. सर्व विद्यार्थीना पौष्टिक आहार व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तीन दिवसांत भोजनगृह समिती गठीत करून टेंडर रद्द झाले नाही तर २८ तारखेला सिनेट मिटींग च्य दिवशी तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीनं दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात एनएसयूआय, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, एसएफआय, लोकायत, युक्रांद, सम्यक विद्यार्थी आंदोलन इ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं देखील विद्यापीठाच्या कुलगुरुंना रिफेक्टरीतील जेवणासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यानंतर विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे आश्वासनं दिली आहेत.
१) भोजनगृह समिती गठीत करण्यात येईल.
२) सोबत ४ दक्षता समित्या देखील गठीत करण्यात येतील.
३) ज्या ज्या मेसमध्ये झुरळं आळई निघालेले आहे. त्यांचे टेंडर रद्द केले जाणार
४) नवीन टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द केली जाणार
५) रद्द केलेल्या टेंडर मालकाकडे ज्या विद्यार्थ्यांचे पैसे जमा आहेत. ती बाकी रक्कम त्यां व्यक्तींकडून परत घेतली जाणार.

जे अजितदादा अन् साखर कारखानदारांच्या मनात, तेच राज्याचं धोरण; राजू शेट्टींची शिंदे-फडणवीसांवर टीका

Read Latest Maharashtra News And Marathi News

बातमी अपडेट होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed