नागपूर: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून चेन्नईमार्गे भोपाळ आणि नागपूर येथे दुर्मिळ कासवांची तस्करी केल्याच्या प्रकरणातील तीन आरोपींना मानधन म्हणून २० हजार रुपये दिले जात होते. वनविभागाच्या तपासात हा खुलासा झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी डीआरआयच्या पथकाने ट्रेनमधून कासवांची तस्करी केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती.
दुर्मिळ प्रजातीच्या कासवांच्या तस्करी प्रकरणी डीआरआयने ३० सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून आरपीएफच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अहमद लाल, मोहम्मद फुलझादी, मोहम्मद अहमद आणि सादिक हुसेन अहमद यांचा समावेश आहे. सूत्रांनुसार सादिकला या दुर्मिळ कासवांना ट्रेनने चेन्नईला नेण्यासाठी १०,००० रुपये आणि मदतीसाठी त्याच्या दोन साथीदारांना प्रत्येकी ५,००० रुपये देण्यात आले होते.

मुख्य सूत्रधार अतिक अन्सारी याच्या सूचनेनुसार या कासवांच्या पेट्या चेन्नईच्या तस्कराच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. मात्र, या दुर्मिळ कासवांची वाहतूक करणार्या आरोपींना या दुर्मिळ कासवांची किंमत लाखोंच्या घरात असेल याची कल्पना होती का? याचा तपास चालू आहे. चेन्नईत या कासवांची डिलिव्हरी घेणारा संशयित आरोपी फरार झाल्याने चेन्नईला पोहोचलेल्या नागपूर वनविभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना १२ ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनविभागाचे पथक आता या प्रकरणाशी संबंधित दुवे तपासण्यात व्यस्त आहे.