• Sun. Sep 22nd, 2024

अपघाताचे राजकारण करण्यापेक्षा उपाय महत्त्वाचा, अपघाताची चौकशी करणार, दादा भुसे यांची माहिती

अपघाताचे राजकारण करण्यापेक्षा उपाय महत्त्वाचा, अपघाताची चौकशी करणार, दादा भुसे यांची माहिती

नाशिक: आज पहाटेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये ५ पुरुष आणि सहा महिला आणि एका चिमुकलीचाही समावेश आहे. अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातोवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.तसेच समृध्दी महामार्गावरील अपघाताची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर येथील घाटी रुग्णालयांत उपचार चालू आहेत. हे सर्वजन बुलढाणा येथील सैलानीबाबांचे दर्शन करुन नाशिककडे परतत असताना अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.

पोलीस ट्रकचा पाठलाग करत होते; चालकाने ब्रेक मारला आणि…; खासगी बसमधील चिमुकल्याने सांगितली आपबिती

मध्यरात्री झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात प्रवाशांजवळील असणारे सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. अपघात स्थळावरील दृष्य मन हेलावणारे होते. अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याने अपघाताची धक्कादायक आपबिती सांगितली. मागून येणाऱ्या ट्रकच्या मागे पोलीस लागले होते. त्या ट्रकने आम्हाला ओव्हरटेक करत अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाल्याचे या चिमुकल्याने सांगितले.

समृध्दी महामार्गावरील अपघात हा मन हेलवणारा आहे. या अपघातात निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अपघाताची कारणे तपासून संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. अपघातातील सर्व प्रवासी नाशिक परिसरातील आहेत. कुणाचाही जीव जाणार नाही यासाठी समृध्दी महामार्गावर उपाययोजना सरकार तर्फे केल्या जात आहेत. अपघाताचे राजकारण करण्यापेक्षा त्यावर उपाय काय केला जावू शकतो याकडे लक्ष असणे महत्वाचे असल्याचे भुसेंनी सांगितले आहे.

समृद्धी महामार्गावार भीषण अपघात, सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

Read Latest Nashik News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed