• Sat. Sep 21st, 2024

हडपसरमध्ये अकरा बांगलादेशी अटकेत; बेकायदा वास्तव केल्याचे उघड, तीन अल्पवयीनांचा समावेश

हडपसरमध्ये अकरा बांगलादेशी अटकेत; बेकायदा वास्तव केल्याचे उघड, तीन अल्पवयीनांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, हडपसर : हडपसर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अकरा बांगलादेशी नागरिकांना लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. बांगलादेशी नागरिकांकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करून विनापासपोर्ट, विनापरवाना राहत असल्याप्रकरणी या आठ जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजाम रहीम अली शेख राठी (वय ३०, रा. उरुळी देवाची), बाबू मोसिन मंडल राठी (वय ३० रा. काळेपडळ, हडपसर), नजमा बाबू मंडल राठी, (वय २५ रा. काळेपडळ), कमरोल रोशन मंडल राठी (वय २२), सागर आलम शेख राठी (वय २२), मरियम कमरू मंडल राठी (वय ३५), आलम शेख राठी (वय २४), शाहिनूर आलम शेख राठी (वय २५ रा. उरुळी देवाची) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी सात बांगलादेशी नागरिकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली होती. या सात जणांनी बांगलादेशातील रहिवासी असल्याचे मान्य केले. मात्र, आरोपींकडे बांगलादेशी असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले होते. या प्रकरणाचा लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून तपास करण्यात येत होता. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड; तसेच मतदार ओळखपत्र मिळवून दिल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेले पुण्यात मजुरी करत होते. मजुरीतून मिळालेले पैसे बांगलादेशातील नातेवाइकांकडे पाठवत होते.

विनापरवाना राहणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांना पकडण्यात आले आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र मिळवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे
शाहीद लतिफ हत्येतील संशयितांना अटक; हल्लेखोर ‘बाहेरील’ देशातून आल्याचा पाकचा आरोप
कारवाईत वाढ

स्थानिक पोलिस; तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांत बेकायदा वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील कारवाईत भर पडली आहे. चाकण परिसरातही नुकतेच अशाच प्रकारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. देशात बेकायदा वास्तव्याबरोबरच देशविघातक कृत्यांमध्ये या नागरिकांचा सहभाग असणार नाही, याकडे प्रामुख्याने यंत्रणांकडून लक्ष देण्यात येते. त्यामुळे बेकायदा वास्तव्य करणारे नागरिक रडारवर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed