• Sun. Mar 8th, 2026
    पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू

    कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये कोल्हापूर पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत हॉटेल भाग्यलक्ष्मी नजीक एक मालट्रक बंद अवस्थेत उभा होता. यावेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणार्‍या चारचाकी कारने MH01 AL 5458 या गाडीने मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिला जागीच ठार झाले असून मृतांमध्ये कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे कॉन्स्टेबल नितीन पोवार आणि मनीषा आप्पासाहेब जाधव, अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तर अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही.

    संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, लहान बहिणीवरही वाईट नजर, नागपुरातील धक्कादायक घटना
    हे सर्वजण कोल्हापूरहून ते मुंबईकडे जात असताना दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी धडकताच मोठा आवाज झाला आणि आवाज ऐकून आजुबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देताच हायवे मदत केंद्राचे दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी तसेच कराड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीसांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान या अपघाताची माहिती समजताच कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. पोलीस दलातील सहकार्‍यांनी नितीन पोवार यांचे फोटो सोशल मीडिया लावत श्रध्दांजली वाहत असून त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वीच नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू, १०० जण जखमी

    Read Latest Kolhapur News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed