• Sat. Sep 21st, 2024
शेती विकून विठूराया चरणी २६ तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, किंमत १८ लाख, महिला भक्त आहे तरी कोण?

पंढरपूर : शेती विकून आलेल्या पैशातून एका महिलेने तब्बल २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केले. या भक्त महिलेच्या दानशूरपणाची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. धाराशीव जिल्ह्यातील महिलेने पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिरात २५.५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केला. तर रुक्मिणी मातेला जवळपास दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. याची एकत्रित किंमत १८ लाख रुपयांच्या घरात जाते

विठूरायापासून तुळजाभवानी, अंबाबाईपर्यंत आणि लालबागचा राजापासून सिद्धिविनायकापर्यंत लाडक्या देवाच्या चरणी दानधर्म करणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. फक्त राज्यातूनच नव्हे, तर देश-परदेशातून मोठमोठ्या दानाचा ओघ महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना होताना दिसतो. पंढरपुरातील सावळ्या विठ्ठलाच्या चरणीही एका आजीबाईंनी दान दिलं आहे. विशेष म्हणजे शेती विकून त्यांनी जणू आपलं सर्वस्वच देवाचरणी अर्पण केलं आहे.

“मला माझ्या विठुराया शिवाय आहे तरी कोण?” असे म्हणत आजीबाईंनी दान केले. श्रीमती बाई लिंबा वाघे असे या महिला भक्ताचे नाव आहे. शेती विकल्यानंतर आलेल्या पैशांतून त्यांनी देवाला २६ तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केला.

दसरा-दिवाळीला ट्रॅव्हल्स काढणार ‘दिवाळं’, खासगी बसचं तिकीट एसटीच्या तिप्पट होण्याची भीती

बाई लिंबा वाघे या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावच्या रहिवासी आहेत. वाघे आजींनी श्री विठ्ठलास २५५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा करदोडा व श्री रूक्मिणी मातेस १९ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले. या अर्पण केलेल्या वस्तू १७ लाख ९९ हजार ३९९ रुपये किमतीच्या आहेत.

बांगर साहेब तुम्हाला भेटायचंय, चिमुरड्याचा VIDEO CALL, पण भेटीची इच्छा अपुरी, यशने रात्रीच जीव सोडला

मंदिर समितीच्या वतीने श्रीमती बाई लिंबा वाघे यांचा सत्कार आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांचे हस्ते साडी उपरणे व श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा देऊन करण्यात आला .

थरांवर थर रचत विठ्ठल-रुक्मिणीच्या सुरेख रुपाचं दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed