शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्यावी. भाजपमध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातो. यांच्या मेळाव्याला गर्दी कशी होते, कोण उत्तर भारतीय होते, कोण बिहारी होते, कोणी भाषण करताना लोक उठून गेले हे सगळ्यांनी पाहिलं. शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ती शिवसेनेच्या विचारांचं सोन लुटायला येतात. मात्र तुमची गर्दी विचारांची नसते,अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
गेल्यावर्षीपासून वादाची ठिणगी
शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या अनेक वर्षांपासून शिवतीर्थावर होतो आणि ही पंरपरा सुरू आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराच सोनं शिवतीर्थावर लुटलं जातं.मात्र, मागच्या वर्षांपासून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे वादाचं सावट दसरा मेळाव्यावर पडलेलं दिसून येत. या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्ष आपल्या भाषणांनी दसरा मेळावा गाजवला होता.त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांसाठी विचारांचं सोनं म्हणून नेहमी पाहिलं जातं.दसऱ्या मेळाव्यामध्ये नवे विचार, नवीन भूमिका घेत शिवसेना पक्षाची घोडदौड सुरु असायची. मागच्यावर्षीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होण्याआधीच वादाची मालिका सुरु झाली आहे.
शिंदे गटाकडून अर्ज मागे
मागच्यावर्षी शिवसेनेत मोठी फूट पडली त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं.आणि उरलेले १५ आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले.त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मागच्यावर्षी सर्वात आधी कोणत्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सुद्धा शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनी मैदान आपल्यालाच पाहिजे असा दावा केला होता.पण अखेर कोर्टानं ठाकरेंना शिवाजी पार्क मैदान देण्याचा निर्णय घेतल्यानं एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानात दसरा मेळावा आयोजित केला. शिंदे गटांनं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागं घेतल्याचं जाहीर केलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News