शनिवारी दुपारी कुलकर्णी यांना रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण कण्यात आली होती. संघटनांनी आवाज उठविल्यावर सोमवारी तपासाने वेग घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे प्रथम चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अक्षय विष्णू सब्बन आणि एक विधीसंघर्ष बालक यांना अटक केली. त्यांचे साथिदार अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सनी जगदाने हे दोघे फरार आहेत. यातील अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. हेरंब रामचंद्र कुलकर्णी महापालिकेत अर्ज केल्याने ती हटविण्यात आली. या रागातून आरोपींनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे कलमही वाढविले आहे. सोमवारी दुपारनंतर तपासाने वेग घेतला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने तपास सुरू केला. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर शहरातील गुन्हा घडल्याच्या टिकाणचे तसेच, निलक्रांती चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको, जोशी क्लासेस येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज मिळविले. त्या फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. त्यावरून हा गुन्हा चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा, अहमदनगर) याने साथीदारांच्या मदतीने केल्याचे आढळून आले.
त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचा मित्र अक्षय विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. पानटपरी ती अतिक्रमणामध्ये येत असल्याने मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी पानटपरी काढण्यासाठी महानगरपालिकेत अर्ज दिला त्यामुळे ती पानटपरी काढण्यात आलेली होती. त्याचा राग मनात धरुन अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरुन चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा, अहमदनगर, अक्षय (पुर्ण नांव माहित नाही) सनि जगधने, व एक विधीसंघर्षीत बालक अशांनी मिळुन केला. पोलिसांनी यातील अक्षय विष्णु सब्बन दातरंगे मळा, विटभट्टीजवळ, ता. जि. अहमदनगर, चैतन्य सुनिल सुडके सुडकेमळा, अहमदनगर आणि एक विधीसंघर्षीत बालक यांना अटक केली. तर दोघे फरार आहेत.