• Sat. Sep 21st, 2024
म्हाडाला हवीय नव्या घरांच्या उभारणीसाठी जमीन, महसूलकडे ७० हेक्टर जागेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) परवडणारी घरे बांधण्यासाठी पुण्यात जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे म्हाडा नव्या जागांच्या शोधात असून, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात महसूल खात्याच्या ताब्यातील सुमारे ७० हेक्टर जागेची मागणी केली आहे. त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली असून, त्याबाबत सकारात्मक अहवाल आल्यानंतर सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या संदर्भात ‘म्हाडा’च्या पुणे विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

‘म्हाडा’ला पुण्यात जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘म्हाडा’ने एप्रिलमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावांसह नागरी जमीन कमाल धारणांतर्गत (यूएलसी); तसेच पुणे महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जमिनी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात एप्रिलमध्ये सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त देऊन ‘म्हाडा’च्या मागणीकडे लक्ष वेधले होते.
धक्कादायक… नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं थैमान सुरूच, ६ नवजात बालकांसह १५ जणांचा मृत्यू
घरांच्या किमती वाढल्या आहेत, तर अनेकांना घर घेण्याची इच्छा असूनही ते जादा किमतीमुळे घेता येत नाही. त्यामुळेच म्हाडाच्या घरांना मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’ने सोडतींमध्ये सुमारे ४० हजार सदनिकांचे पुणे विभागात वितरण केले आहे. ‘म्हाडा’च्या घरांचा सामान्यांना आधार आहे. ‘म्हाडा’ने आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत इमारती उभारून सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आतापर्यंत पुण्यात बिबवेवाडी, कोंढवा, येवलेवाडी, धानोरी, खराडी, बाणेर, पिंपळेनिलख, वाकड, मोशी, चिंचवड, मोरवाडी आदी ठिकाणी ‘म्हाडा’ची घरे उभारण्यात आली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागांत ‘म्हाडा’साठी फारशा जागा उपलब्ध नसल्याचे ‘म्हाडा’कडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी ‘म्हाडा’ने पुण्याच्या समाविष्ट गावांमधील पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) मागणी केली होती.

सध्या ‘म्हाडा’कडे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुमारे १५ हेक्टर जागा आहेत. त्यापैकी काही जागांवर आरक्षण असून, काही जागा विकसित करण्यात येत आहेत. त्यामुळे ‘म्हाडा’ने नव्या जागांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे महसूल खात्याकडील जागेची मागणी केली आहे.

– अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा

साडेसहा तास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी यशस्वी, तरुणाला सव्वादोन किलोच्या गाठी पासून मुक्तता
‘म्हाडा’ने कमाल जमीन धारणांतर्गत (यूएलसी) असलेल्या जमिनींवर हक्क दाखवला होता. कायदाच नसल्याने त्या अंतर्गत जमिनी फारशा शिल्लक राहिल्या नाहीत. ‘यूएलसी’द्वारे मिळालेल्या अनेक जमिनी ‘म्हाडा’ने वापरल्या आहेत. महसूल खात्यांतर्गत सरकारच्या ताब्यातील जमिनींची पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुमारे ७० हेक्टर जागेची मागणी केली आहे, असे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेकाप आमदाराकडून भाजप खासदाराच्या पॅनेलचा धुव्वा, नांदेडमध्ये दाजी जोमात, मेहुण्याला धूळ चारली!

पुण्यात अजितदादांची वर्णी, सोलापूरकरांच्या मागणीनं नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत दादांची कोंडी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed