मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हाच पाऊस पुढच्या ३ दिवसांत कायम असणार आहे. आगामी ३ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्यांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये आजपासून पुढच्या ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. तर पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचेही पाहायला मिळेल. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात पावसाचं वातावरण आहे. दरम्यान, आज विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३ दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर पुढचा ३ दिवसांत हा पावसाचा जोर कायम असण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.