• Sun. Sep 22nd, 2024
व्यायामाला जाणाऱ्या धडाकेबाज हवालदाराला टेम्पोने उडवलं, सीसीटीव्ही फूटेजमुळे घातपाताचा संशय

पुणे : यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता. इंदापूर) हे पायी जात असताना एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये कदम हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोर शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. हा नेमका अपघात होता की घडवून आणलेला कट याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिस खात्यातच याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

संदीप कदम हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. हॉटेल अभिषेक समोरील रस्त्यावरुन ते पायी जात असताना पाठीमागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी टेम्पोने कदम यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ते रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले.

चार हजारांच्या लाचेपायी गेली लाज! ५२ वर्षीय GST अधिकारी महिलेला रंगेहाथ अटक
त्यामध्ये कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना स्थानिकांनी बारामती शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने संदीप कदम यांना पुढील उपचारासाठी बारामतीहून पुण्यातील एका बड्या रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून संदीप कदम यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नऊ वर्षांपूर्वी विवाह, सासुरवाडीत जावयाने तिघांना संपवलं, नगरला हादरवणाऱ्या तिहेरी हत्यांचं कारण समोर
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवाशी असलेल्या संदीप कदम यांनी बारामती शहर, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लोणी काळभोर पोलिस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावले आहे. मागील तीन वर्षांपासून संदीप कदम हे यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलिस चौकीत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. संदीप कदम यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असून, त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक गुन्ह्याची उकल केलेली आहे.

सासूच्या टोमण्यांना सून वैतागली, पुण्यात २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

अपघात की घडवून आणलेला कट?

बारामती येथे दोन दिवसांपूर्वी व्यायामाच्यावेळी चालताना तीन चाकी टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. हे फुटेज पाहिल्यानंतर संदीप कदम यांचा अपघात की घडवून आणलेला कट याबाबतची चर्चा खुद्द पोलिस दलातच सुरु झाली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; धुळ्यातील भाजप नगरसेवकासह तिघांचा मृत्यू

संदीप कदम यांनी एका गंभीर गुन्ह्यात पकडलेले काही आरोपी तुरुंगातून नुकतेच बाहेर आले आहेत. हे सर्व आरोपींनीच संदीप कदम यांचा अपघात घडवून आणली की काय अशी चर्चा पोलिस खात्यात मागील दोन दिवसांपासून सुरु आहे. तर दुसरीकडे या चर्चेची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही त्या दिशेने तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed