• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra Politics: वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी दोषमुक्त, राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर बोलावणं

    Maharashtra Politics: वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी दोषमुक्त, राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर बोलावणं

    शिरूर, पुणे : गेल्या दोन वर्षांपासून खोट्या आरोपांची लढाई लढत असताना अखेर वाबळेवाडीचे तात्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. या आरोपातून मुक्त झाल्यानंतर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारे गुरुजी आणि वाबळेवाडी ग्रामस्थांना थेट ” शिवतीर्था”वर येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी वारे गुरुजी आणि वाबळेवाडी ग्रामस्थांचा सत्कार केला जाणार असल्याचे वाबळेवाडी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.

    जिल्हा परिषदेची पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून वाबळेवाडी शाळा परिचित आहे. संपूर्ण शाळा ही काचेची आणि क्रमिक अभ्यासक्रम देणारी आहे. याशिवाय याठिकाणी १६ वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन केले जाते. त्यामुळे दत्तात्रय वाबळे यांना ” वाबळेवाडी शाळेचे” जनक म्हणून देखील ओळखले जात आहे. खुद्द राज ठाकरे यांनी त्यांना निमंत्रित केल्याने वाबळेवाडी ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे.

    शनिवारी दत्तात्रय वारे यांना दोषमुक्त केल्याचे आदेश जिल्हा.परिषदेकडून काढण्यात आले. त्यानंतर मुंबईतील मनसे कार्यालयाकडून गुरुजींना शिवतीर्थावर यायला कधी जमेल? अशी विचारणा करण्यात आली आहे. आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही देखील देण्यात आली आहे. आता वारे दोषमुक्त झाल्याने राज ठाकरे यांच्याकडून दत्तात्रय वारे यांना फोन आला आणि मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आहे. पुढील चार दिवसांत तारीख निश्चित करीत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे.

    दत्तात्रय वारे गुरुजी लढले अन् जिंकले, पुणे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, आता वाबळेवाडीत पोहोचताच ते काम करणार

    माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी देखील वारे गुरुजी यांचा सत्कार करुन अभिनंदन केले आहे. वारे गुरुजींचा आरोपांचा ससेमिरा आता संपला असून लवकर ते पुन्हा वाबळेवाडीत जोमाने सुरुवात करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    पुणे जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून वाबळेवाडी शाळेची जोरदार चर्चा होती. मात्र, शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून वारे यांची चौकशी सुरु होती. यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, बच्चू कडू यांनी देखील सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर विभागीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र, आरोपातून त्यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed