• Sat. Sep 21st, 2024

अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप

अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप

पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत जाणार असे वक्तव्य करणे हे किती हास्यास्पद आहे. जेव्हा अजित दादांवर भाजपचा छोटा नेता बोलतो, तेव्हा हे काहीच बोलत नाहीत, उलट भाजपला मोठं करण्याचे काम करत आहे, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. चिंचवड येथे शनिवारी रात्री रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय टीका करणाऱ्यांना उत्तरे दिली आहेत.

आम्ही राज्य सांभाळतो अन् तुम्ही मला शिकवता? बारामतीत अजित पवार भडकले, संचालक मंडळाची कानउघडणी!

यावेळी रोहित पवार म्हणाले की, माझ्यावर बोलताना सर्वजण उड्या मारतात. पण अजित दादांवर जेव्हा एकदा भाजपचा छोटा नेता बोलतो त्यावेळी मात्र सर्वजण गप्प बसतात. कारण भाजपला त्यांना खुश करायचं आहे. तसेच सुनील शेळके यांनी जे आरोप केले त्यात काही तथ्य नसून ते हास्यास्पद आहेत. तसेच निधी वाटप करताना ब्लॅकमेलिंगचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. हे चुकीचे असून आतापर्यंत कधीच असे झालेले नाही. सत्तेसाठी पवार साहेबांच्या जवळचे नेते तिकडे गेले त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही आता संघर्षाची भूमिका घेतली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, लांडग्याचं पिल्लू, अजित पवार यांच्याकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भला माणूस आहे. पण त्यांच्यावर दबाव असू शकतो. त्यामुळे त्यांना दिल्लीला जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीचा निकाल शिंदे गटाविरुद्ध घेणार नाहीत. न्यायालयाकडून निकाल लागला असे प्रयत्न सुरू असल्याचे देखील रोहित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed