• Sat. Sep 21st, 2024

गुरुजी लढले अन् जिंकले,जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, दत्तात्रय वारे दोषमुक्त, काय घडलेलं?

गुरुजी लढले अन् जिंकले,जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, दत्तात्रय वारे दोषमुक्त, काय घडलेलं?

पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आलेली वाबळेवाडी शाळा, त्याच शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून त्यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले कुठलेही आरोप सिद्ध न झाल्याचा स्पष्ट अहवालच विभागीय चौकशी समितीने जिल्हा परिषदेला सादर केल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दोषमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून वारे यांची चौकशी सुरु होती. यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, बच्चू कडू यांनी देखील सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर विभागीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या संपूर्ण चौकशीत वारे यांच्यावर झालेले हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय कामात निष्काळजीपणा असे कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचे समितीने लेखी स्वरूपात कळवले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे सर्व आरोपातून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी करुन तो वारे यांना समक्ष वारे सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी जालिंदरनगर येथे त्यांना देण्यात आला आहे.
मुंबई-पुण्याकडे येताना कशेडी बोगदा वापरता येणार नाही; पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या मोठी अपडेट
दत्तात्रय वारे यांनी अनियमिततेचे आरोप, चौकशी, निलंबन आणि होत असलेली बदनामी यामुळे त्यांनी पायात चप्पल घालणे देखील सोडून दिले होते. त्यामुळे वाबळेवाडीकर नागरिकांना ते पाहावत नव्हते. मात्र त्यांना दोषमुक्त केल्याने त्यांनी वाबळेवाडीत आल्यानंतरच चप्पल घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती वाबळेवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस, सगळीकडे दाणादाण, फडणवीसांनी मुंबईतून सूत्रे फिरवली, यंत्रणा हलली
दत्तात्रय वारे यांंचं निलंबन करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बाजूनं भूमिका घेतली होती. स्थानिक राजकारणातून निलंबन झालं असावं, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. हेरंब कुलकर्णी यांनी देखील दत्तात्रय वारे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. आता दत्तात्रय वारे यांचं निलंबन रद्द आणि त्यांना जिल्हा परिषदेनं दोषमुक्त केल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.

Pune Rain :पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यावर पाणीच पाणी, पुढील चार दिवस पावसाचे, हवामान विभागाची अपडेट

भ्रष्टाचार केला असेल, तर सखोल चौकशी करा; सुप्रिया सुळेंचं मोदींना आव्हान, अजित दादांचं टेन्शन वाढवलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed