• Mon. Nov 25th, 2024
    उजनीत ढगफुटीसारखा पाऊस व्हायला पाहिजे, पण नुकसान होऊ नये : अजित पवार

    पुणे: उजनी धरणात पाणी नाही. तेथे केवळ २५ टक्के पाणी आहे. त्या भागात एवढा पाऊस पडला पाहिजे, ढगफुटी सारखा पाऊस पडायला पाहिजे. तेव्हा उजनीचं क्षेत्र पाण्याने भरेल.. पण ज्या भागात नुकसान होणार नाही अशाच भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामतीतील विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. यावेळी ते बोलत होते.

    पुढे बोलताना पवार म्हणाले की, मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस पडायला लागला आहे. तो अजून पडत राहावा. गणेश विसर्जनासह नवरात्र उत्सवात पाऊस पडावा. बारामतीतील काहींनी टँकर सुरू करा, जनावरांच्या छावण्या सुरू करा, चारा डेपो सुरू करा, अशा मागण्या केल्या होत्या. त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्याला सावरायला पुढील तीन वर्ष जातात. हे शेतकऱ्याला परवडणारे नसते.
    अमित शाह मुंबईत गणेश दर्शनाला आले अन् लोकसभेसाठी धक्कादायक नावांची चाचपणी करून गेले…
    जानाई-शिरसाई, पुरंदर, नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा, वीर, भाटघर, गुंजवणी, खडकवासला, पानशेत, टेमघर, धरणांमध्ये पाणी आहे. मात्र उजनी धरणात पाणी नाही. तेथे केवळ २५% पाणी आहे. त्या भागात एवढा पाऊस पडला पाहिजे, ढगफुटी सारखा पाऊस पडायला पाहिजे. तेव्हा उजनीचं क्षेत्र पाण्याने भरेल.. मात्र याचवेळी ज्या भागात नुकसान होणार नाही अशाच भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    Monsoon Update : पुढील चार दिवसात राज्यात कुठं पाऊस पडणार? हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या
    यंदाच्या पावसाने ओढ दिल्यामुळे मागील सव्वाशे वर्षात इतका कमी पाऊस पडला नव्हता. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस बारामतीत होता. आता कमी प्रमाणात का होईना पाऊस पडायला लागला आहे. भाटघर, निरा देवधर, शंभर टक्के भरले आहे. गुंजवणी पुढील एक-दोन दिवसात शंभर टक्के भरेल. वीर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होईल, असेही पवार म्हणाले.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, वीरचं पाणी धाडसाने सोडले म्हणून बारामतीतील शेतकरी काही प्रमाणात सुस्थितीत आहे. नाहीतर आपलं काय खरं नव्हतं.. शेतीतील पिके फार खाक होऊन गेली असती, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
    उद्धव ठाकरे नावाच्या गलबताला आधार देणारं बंदर, रश्मी वहिनींच्या स्वभावाचे सुषमाताईंनी पत्रातून पदर उलगडले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *