छत्रपती संभाजीनगर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर पडेगाव भागामध्ये सैलानीनगर आहे. येथील सद्गुरू शंकर बाबा पोथीकर हे सैलानी बाबाचे भक्त होते. त्यांना सैलानी बाबा प्रसन्न असल्याचं येथील भाविक सांगतात यामुळे ठिकाणी सैलानी बाबाची दर्गा आहे. ४५ वर्ष पूर्वी सैलानी बाबाचं दर्गा शहराच्या मध्यभागी होती. मात्र, नंतर शंकर बाबा पडेगाव भागामध्ये राहत असल्याने या ठिकाणी सैलानी बाबाची दर्गा बनवण्यात आला. शंकर बाबा यांना सैलानी बाबा प्रसन्न असल्यामुळे येथील भाविक त्यांच्याकडे येत असतं.
त्यांच्याकडे येणाऱ्या भाविक हे सर्व जातीधर्माचे होते. यामुळे शंकर बाबा यांनी सैलानी बाबाच्या दर्गा मध्ये गणपती बाप्पा बसवायचा निर्णय घेतला. या परंपरेला ३० वर्षांपूर्वी सुरुवात केली. शंकर बाबा यांचे निधन झाल्यानंतर त्यांची देखील समाधी या दर्ग्यामध्ये बनवण्यात आली त्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील समाधी याच दर्ग्यामध्ये आहे. गेल्या ३० वर्षांपासून या दर्ग्यामध्ये गणेश मूर्ती बसवली जाते यामुळे या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक येत असतात. या ठिकाणी नमाजही पठाण होते आणि याच ठिकाणी आरती देखील घेतली जाते.
गुरुवारी या ठिकाणी सर्व धर्माच्या आरती व पूजा तसेच नमाज पठण केली जाते. गुरुवारी शंकर बाबा यांना देखील स्नान घातलं जातं आणि त्यानंतर अकरा वाजता सर्व धर्माच्या आरती केल्या जातात. ज्या भाविकांना दर्शनासाठी यायचं असेल त्यांनी गुरुवारी आवर्जून यावं, तसेच रोज दर्शनासाठी सकाळी सात ते सायंकाळपर्यंत दर्गा सुरू असते असे शंकर बाबा यांच्या सूनबाई सांगतात.
दरवर्षी आम्ही गणेशोत्सवाच्या दहा दिवसांची आतुरतेने वाट बघत असतो या दहा दिवसांमध्ये आम्ही उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो.गेल्या २८ वर्षापासून मी या दर्गाची सेवा करते या ठिकाणी जी इच्छा मागितली ती पूर्ण होते या ठिकाणी असलेल्या सर्वधर्मसमभावाची भावना हे या दर्ग्याचे वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच आम्ही या ठिकाणी येत असतो.
– शैलेश चौधरी,भाविक
देशामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे मात्र आम्ही या दर्गाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन आपापल्या देवाला प्रार्थना करतो.या दर्गा मध्ये नमाजही पठाण होते व हिंदू धर्माची आरती देखील होते येथे येणारा प्रत्येक नागरिक हा एक दुसऱ्या सोबत बंधू भावाचा भावनेने येत असतो त्यामुळे इथे हिंदू आणि मुस्लिम एकत्र त्यांच्या त्यांच्या धर्माचा पालन करतात
– अमजत पठाण ,भाविक
तुम्हाला जर या सैलानी बाबाच्या दर्ग्याचा दर्शन घ्यायचं असेल तर छ.संभाजीनगर शहरापासून-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पडेगाव भागामध्ये सैलानी नगर आहे या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येऊ शकतो.