• Sat. Sep 21st, 2024

Gautami Patil : गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द, प्रशासनासह पोलिसांनी परवानगी नाकारली, म्हणाले..

Gautami Patil : गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द, प्रशासनासह पोलिसांनी परवानगी नाकारली, म्हणाले..

कोल्हापूर: गणेशोत्सव काळात कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणत जिल्ह्यात कार्यक्रम असतात आणि यावेळी पोलिसांवर मोठा ताण असतो. आजपर्यंतचा गौतमी पाटील यांचे कार्यक्रम पाहिला तर अतिउत्साही लोकांकडून निर्माण होणारा गोंधळ या सर्व पार्श्भूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू असून मोठ्या प्रमाणत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील २२ सप्टेंबरला नंदगाव तर २४ सप्टेंबरला राशिवडे या गावात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या दोन्ही कार्यक्रमाला पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागांनं परवानगी नाकारली असून यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे.

५ लाख टन कांदा रेशनवर विक्री करावा, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आजपासून बेमुदत संपावर
सध्या गणेशोत्सव सुरू असून हा सण शांततेत पार पडावा यासाठी संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर आहे. ज्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी होते अशा कार्यक्रमांना पोलिसांना पाचारण करावा लागतं आणि आताच्या स्थितीला पोलिसांना तैनात करणे अशक्य असल्याने आम्ही ही परवानगी नाकारली असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.
India Canada Relation: मुक्त व्यापार करार रद्द, भारत-कॅनडा संबंधांत वितुष्ट, पुढे काय परिणाम होणार?

या आधी देखील कार्यक्रम रद्द करण्याची वेळ:

गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटला की गोंधळ हा आलाच…या आधी देखील नांदेड, नाशिक, सातारा, परभणी येथे कार्यक्रमात अतिउत्साही चाहत्यांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा जवळ असलेल्या सीमा भागात देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र येथे देखील हुल्लडबाजी केल्याने कार्यक्रम थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली होती. याशिवाय तिच्यावर अनेकवेळा टीका ही झाली. तर आता या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात गौतमी पाटीलच्या यांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. आयोजकांनी देखील कार्यक्रम रद्द केल्याचं पत्र पोलिसांना दिले आहे. दुसरीकडे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
राजीव गांधींची आठवण, सरकारला धारदार प्रश्न, महिला आरक्षणावर सोनिया गांधींचे दमदार भाषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed