कराड दक्षिण काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेनंतर शेरे येथील जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसने प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे. समता, मानवता तोडण्याचा या मूठभर लोकांचा डाव आहे. त्यांचा ‘मोदी’ हा चेहरा पुढे असला, तरी त्यांचा बोलवता धनी ‘आरएसएस’ आहे. त्यांच्यामागे आपली माणसे धावत आहेत.’
सत्तेसाठी नरेंद्र मोदी कोणत्याही थराला जातील. केंद्र सरकारने अब्जावधी रुपये जाहिरातीवर खर्च करूनही सामान्य लोकांच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. केंद्र सरकारने देशातील मालकीच्या मालमत्ता विकल्या व काहींचे खासगीकरण केले. रेल्वेची ९० हजार हेक्टर जमीन लिलावात काढली आहे, असे चव्हाण म्हणाले.
‘निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जागा दाखवील’
‘मी मंत्री असेल तरच विकास होईल, असे काही नेते सांगतात; पण विकास समाजाचा करायचा की स्वतःचा? तुरुंगातून बाहेर यायचे होते का? राज्यातील विश्वासघातकी सत्तेला जनता कधीही आशीर्वाद देणार नाही. गद्दार व लाचारांचे राज्य झाल्याचे वाईट वाटते. खोकी घेऊन सरकार पाडले; पण आता तुम्ही निवडणुका घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवील,’ असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
महाराष्ट्रात लागणार मुदतपूर्व निवडणुका
आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरून राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशामध्येलोकसभेच्या निवडणुका या वेळेत होतील. मात्र,महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका शंभर टक्के लागणार आहेत, असा दावा विनायक राऊत यांनी केला. भाजप अयोध्येतील राम मंदिर कधी पूर्ण होतंय त्यांची वाट पाहत आहे. सध्या मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले. त्यामुळे राम मंदिर कधी पूर्ण होतंय त्याची वाट भाजपमधील काही नेते वाट पाहतायत, असेही विनायक राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, कीभाजप सरकारला राम मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाण्याचे धारिष्ट्य होणार नाही.म्हणून मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र प्रशासन चालवत आहे. इथे लोकप्रतिनिधींना स्थान नाही.मात्र,लोकसभेच्या निवडणुका वेळेवर होतील. महाराष्ट्रासहित अनेक राज्यांतील विधानसभा ‘वन नेशन वन इलेक्शन’या अंतर्गत घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेहीराऊत म्हणाले.जर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सज्ज आहोत,असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. समोरचा उमेदवार कोण असेल त्याची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरू आहे. जो मोठा पक्ष शक्तिशाली भाजपआहे.त्यांच्या बाजूला असलेले टिलू-पिलू जे आहेत तेसुद्धा चाचपणी करत आहेत.त्यामुळे त्यांना एखादा पडेल उमेदवार मिळेल,अशी आशा धरायला काहीच हरकत नाही,असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केले.