शिर्डी लोकसभा मतदारसंघ २००९ साली एससी राखीव झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेकडून खासदार झाले. नंतर २०१४ साली वाकचौरेंनी शिवबंधन झुगारुन काँग्रेसचा हात थांबला यावेळी सेनेकडून बबनराव घोलप यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आलं मात्र काही कारणास्तव बबनराव घोलप यांना निवडणुक लढवता आली नाही. त्यांनंतर सेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली आणि ते अवघ्या १७ दिवसांत खासदार झाले. परंतु, मागील वर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोखंडे यांनी देखिल ठाकरेंची साथ सोडली.यावेळी आदित्य ठाकरे शिर्डीत संवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता त्यांनी बबनरावांना तयारीला लागा असे सांगितले होते.
बबनराव घोलप त्यानंतर तयारीला लागले त्यांच्यावर शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली गेली नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. मात्र, वाकचौरेंच्या घर वापसीने पुन्हा उमेदवारीचा पेच निर्माण झाला. त्यामुळे बबनराव घोलप सध्या नाराज आहे. मात्र, घोलप पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी किंवा वंचित मध्ये प्रवेश केल्यास नाशिक येथे आमदार सरोज अहिरे आणि शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचं टेन्शन वाढणार हे मात्र नक्की आहे.
दोन्ही पक्ष शिवसेनेचे मित्र पक्ष
यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित हे दोन्ही पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे मित्र पक्ष असल्याने त्यांच्या अध्यक्षांची आम्ही पिता पुत्रांनी त्यांची भेट घेतलेली आहे.