• Sat. Mar 14th, 2026

    पत्नीच्या माहेरी जाऊन पतीनं केलं असं काही की दोन्ही कुटुंबं हादरली; अंगावर शहारे आणणारी घटना

    पत्नीच्या माहेरी जाऊन पतीनं केलं असं काही की दोन्ही कुटुंबं हादरली; अंगावर शहारे आणणारी घटना

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पत्नीच्या माहेरी जात तेथे स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत एका तरुणाने आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.

    काय घडलं?

    विनोद राजाराम चव्हाण (वय ३०, रा. साई लॉन्सच्या बाजूला, नांदूर नाका) असे मृताचे नावे आहे. विनोद याची पत्नी कौटुंबिक कलहामुळे माहेरी गेली होती. सोमवारी (दि. ११) दुपारी दीड वाजता पती विनोद तेथे गेला. त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीररीत्या भाजलेल्या विनोदला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    विद्यार्थ्याने संपवलं जीवन

    पंचवटीतील मखमलाबादरोडवरील फडोळ मळा भागात राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेतील वीसवर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. अथर्व बाळासाहेब थेटे असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अथर्वच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.
    नागपूर हादरलं! ब्लॅकमेलिंगला कंटाळून ३८ वर्षीय व्यक्तीचं धक्कादायक पाऊल, Facebook लाईव्ह केलं अन्…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed