• Mon. Nov 25th, 2024
    ठाण्यात गणेशविसर्जनासाठी ४२ कृत्रिम तलाव, ‘या’ ठिकाणी करता येईल बाप्पांचं विसर्जन

    ठाणे : ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावांची संख्या यावर्षी वाढविण्यात आली असून शहरातील विविध ४२ ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. जमिनीत खड्डा न खणता जमिनीवर कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असून नागरिकांनी पर्यावरणभिमुख घरगुती गणेशविसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

    घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन हे दीड, पाच, सात, नऊ आणि अनंतचतुदर्शी दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असते. नागरिकांची विसर्जनघाटावर गर्दी होऊ नये तसेच पर्यावरणभिमुख गणेशविसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात येणार आहेत. दोन फूटापर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यामध्ये करता येईल, असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. उथळसर प्रभागसमितीअंतर्गत रुस्तमजी १, रुस्तमजी २ (अटायर बिल्डिंग), परुळेकर मैदान, सिद्धेश्वर टाकी, रुणवालनगर नागेश्वर मंदिराजवळ, परमार्थ निकेतनसमोर, ठामपा मुख्यालजवळ. कळवा प्रभागसमिती अंतर्गत ९० फीट रोड कळवा, सह्याद्री शाळा, सायबा क्रीडा नगरी मनिषानगर, खारेगाव नाका पोलिस चौकीमागील मैदान कळवा पूर्व, दिवा प्रभागसमितीअंतर्गत पडले बीएसयूपी दिवा, माय सिटी दिवा प्रभागसमिती, कल्याणफाटा आरोग्य केंद्र, अरिहंत आरोही कल्याण शीळ रोड, दिवा महोत्सव मैदान दिवा शिळ रोड.

    पर्यटकांसाठी गुड न्यूज; मरीन ड्राईव्ह सुशोभिकरणाचा श्रीगणेशा, ‘या’ परिसरांचा हेरीटेज विकास होणार
    नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत रहेजा संकुल, कशिश पार्क, सद्गुरू गार्डन, बारा बंगला कोपरी, गावदेवी मैदान कोपरी. माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत स्प्रिंग हिल सोसायटी वाघबीळ ते सरस्वती स्कूल रस्ता, विजयनगी ॲनेक्स, लोढा लक्झरीया माजिवडा, अर्बन पार्क गार्डन, हायलॅण्ड मैदान, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रेश्वर शंकर मंदिर परिसर, शंकर मंदिर मुंब्रा, लोकमान्यनगर प्रभाग समिती अंतर्गत लोकमान्यनगर बसस्टॉप, लक्ष्मीपार्क- फेज 1- सिद्धीविनायक उद्यान परिसर, आचार्य अत्रे मार्ग कोसरस नक्षत्र संकुल परिसर, दोस्तीविहार संकुल परिसर, पु.ल.देशपांडे मार्ग रुणवाल प्लाझा परिसर, वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत वसंतविहार क्लब हाऊस, समतानगर वेल्फेअर सेंटर, पवारनगर बसस्टॉपजवळ, स्वामी विवेकानंद म्हाडा वसाहत, सिद्धांचल संकुल इलाईट गार्डनजवळ. वागळे प्रभागसमिती अंतर्गत रस्ता क्र. २२ नेप्चुन कंपनीजवळ, रस्ता क्र. २२ पासपोर्ट कार्यालयाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ श्रीनगर, अयप्पा मंदिरासमोर श्रीनगर, हिंदुस्थान हॉटेलजवळ अंबिकानगर या ठिकाणी टाकीमध्ये विसर्जनव्यवस्था करण्यात आली आहे.

    हॉटेल ‘सूट’वरून मुनगंटीवार अस्वस्थ; जिल्हाधिकाऱ्यांची केली कानउघाडणी, नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed