• Mon. Nov 25th, 2024
    साहेब पुढचे मुख्यमंत्री व्हावेत, संगमनेरातील दर्ग्यावर समर्थकांची प्रार्थना, विखेंची शेरोशायरी

    अहमदनगर : आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, ही इच्छा बाळगून असलेले महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करतात. अनेकदा तसे पोस्टर लावले जात असल्याचेही पहायला मिळाले आहे. तर कधी आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी देवाला साकडे घालण्यात येते. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा आहे. यातूनच गुरूवारी संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्ग्यावर यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी स्वत: विखे पाटील उपस्थित होते. त्यांनीही मग शेरोशायरी करीत कार्यक्रमात रंग भरला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील मुस्लिम नेते-कार्यकर्त्यांचे विखे पाटालांवरील हे प्रेम राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

    संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्गा ट्रस्टच्या उर्स कमिटीच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. उत्सव समितीचे अध्यक्ष शौकत जहागिरदार, चीफ ट्रस्टी जावेद जहागिरदार यांच्यासह जहागिरदार परिवाराचे विखे पाटील यांच्याशी जुने संबंध आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास विखे पाटलांना दरवर्षी निमंत्रण असते. पक्ष बदलानंतरही ही प्रथा कायम राहिली.

    गुरूवारी झालेल्या कार्यक्रमाचेही विखे पाटील यांना निमंत्रण होते. विखे पाटील यांच्या उपस्थितीत दर्ग्यावर चादर अर्पण आणि प्रार्थना झाली. यावेळी जहागिरदार परिवार आणि उपस्थित भाविकांनी २०२४ मध्ये विखे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करून ख्वाजा पीर महंमद यांच्याकडे तशी प्रार्थना केली. विखे पाटील यांनीही यावेळी दर्ग्याचे मनोभावे दर्शन घेतले.

    फडणवीसांना नावं ठेवता? पण ते देखणे, उलट ठाकरे… नारायण राणेंचा निशाणा
    या निमित्त मैफील ए ख्वाजा हा कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निमंत्रितांनी यामध्ये कला सादर केली. विशेष म्हणजे विखे पाटील यांनीही यावेळी राजकीय आशय असलेली शेरोशायरी करून यात रंग भरला. अर्थात त्यातूनही त्यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधण्याची संधी साधली.

    विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात!

    यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, संगमनेरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत या उत्सवाचे मोठे योगदान आहे. दरवर्षी मी येथे येत असतो. येथून मला नेहमी नवी ऊर्जा मिळते. हा दर्गा येथील बंधूभावाचे प्रतीक आहे. आज येथे कव्वालीचा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त मीही काही सादर करू इच्छितो असे म्हणत विखे पाटील यांनी पुढील शेर सादर केले.

    Contract Recruitment: सरकारी कार्यालयांमधील कंत्राटी भरतीबाबत अजित पवारांचं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण, म्हणाले..
    सुना है दुष्‍मनों की गलीयोंमे आजकल मातम है
    लो हम आ गये, विकास का सुरज रोषन करने.
    पिछली बार मै जब यहाँ आया तो मैने दोस्ती की अपिल की थी.
    लेकीन किसी ने एक दिन पूछ लिया…
    जब आपका दोस्त संगमनेर में है…
    तो तुम्हारा यहाँ क्या काम हैं?…
    मैने भी मुस्कुराते हुए जवाब दिया… जहाँ मेरा दोस्त नाकाम हैं,
    वही तो मेरा सबसे ज्यादा काम हैं…
    वही तो मै कर रहा हॅू…
    आपके जो काम वो ना कर सका,
    उसे मुझेही तो करना है…
    क्‍योंकी,
    हम यारों के है यार, हम यारों के है यार,
    वफादारों के लिए है दिलदार

    हमसे मुकाबला न कर, हमसे मुकाबला न कर
    वरना घुमते रहोगे दर बदर.

    प्रभादेवीतील ‘त्या’ राड्याची धास्ती, गणपती विसर्जनाला स्वागत मंडप नको, राजकीय पक्षांना पोलिसांची मनाई
    याला टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद मिळाला. यातून राजकीय अर्थ काढले जात आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *